Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर (प्रतिनिधी)

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांचा सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश दिले आहेत सोलापूर महापालिकेने या आदेशाचे उल्लंघन करून ऑफलाईन सभेचे आयोजन करून राज्य सरकार च्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे महापौर व सभागृह नेता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी केली आहे.

महसूल व वन विभागाकडील दिनांक 25/6/ 2021 च्या आधीसुचने द्वारे सुरक्षित महाराष्ट्रासाठी निर्बंध बाबत सूचना विहित केलेल्या होत्या राज्यांमध्ये सद्यस्थितीत covid-19 संक्रमणअस कारणीभूत असणाऱ्या कोरोनाविषाणू उत्पपरिवर्तनामुळे निर्माण झालेला डेल्टा प्लस या विषाणू प्रकारच्या प्रदुर्भाव वाढण्याचा धोका नमूद केला होता सदर विषाणू अनेक दृष्ट्या अधिक घातक असून अतिशय गतीने संक्रमित होतो त्यामुळे गर्दी व एकत्रीकरण होणारे कार्यक्रम सभा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावे अशा सूचना दिल्या होत्या या अधिसूचनेत नागरी स्थानिक संस्था च्या सभा बाबत सर्व सभा बैठका केवळ ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशा सूचना होत्या त्या सूचना डावलून सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर व सभागृह नेत्यांनी आज अंदाजपत्रके ऑफलाईन सभेचे आयोजन करून कोरोना संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

महानगर पालिका प्रशासना च्या वतीने सर्वसामान्य गरीब नागरिक व व्यापारी यांच्याकडून निर्बंध चे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करून दंड वसूल केला जातो त्याच महानगर पालिका प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कोण कारवाई करेल असा प्रश्ण सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके,उपाध्यक्ष सीताराम बाबर ,संपर्कप्रमुख सोमनाथ पात्रे, सचिव गजानन शिंदे, विकि डोलारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *