कोंडी चिंचोळी परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी; वनविभागाचे आवाहन

Big9news Network

चिंचोळी MIDC परिसरात आज सकाळी ८:००वाजण्याच्या सुमारास. बिबट्या सदृश प्राणी दिसला. कामगार वर्ग कामासाठी रिक्षामधून जात असताना MIDC मधील LHP कंपनी जवळ झाडीमधून रस्ता क्रॉस करत असताना एक बिबट्या सदृश दिसून आला. बिबट्या सदृश प्राणी दिसल्यामुळे कोंडी, चिंचोळी आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे .

सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरची टीम घटना स्थळी पोहचली. MIDC जागेची पाहणी केली असता ज्याठिकाणी बिबट्या सदृश प्राणी दिसला त्याठिकाणी वनविभाग व WCAS च्या टीमला बिबट्या सदृश पायाचे ठसे आढळून आले आहे. मिळालेल्या प्राण्याचे ठसे एक्सपर्टना पाठवून दिलेले आहे. तरी MIDC परिसरातील कामगारांनी आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

बिबट्या हा नेहमी रात्री वावरणारा प्राणी आहे. अत्यंत लाजनारा प्राणी , मिळेल त्या जागेत राहणारा व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी. वृक्षतोडीमुळे या बिबट्याने शेती हेच आपले राहण्याचे स्थान निवडले आहे. घरालगत असलेली शेती व गुरांचे गोठे हे त्याला आकर्षित करतात. शेतीत सहज मिळणारे बेडूक, शेतकर्यांच्या शेळ्या व मेंढ्या, कुत्रे ही त्याची मुख्य शिकार. तसेच शेतीला पाणी द्यावे लागते, त्यामुळे पाण्याचाही प्रश्न सुटतो. वाढत्या ईमारतींच्या जंगलामुळे व जंगलं नष्ट झाल्यामुळे त्याच्याकडे इतर पर्यायच उरला नाही.

अशा वेळी बिबट वावर क्षेत्रात वावरताना काय काळजी घेतली पाहिजे

1) अशा क्षेत्रात फिरताना नेहमी घुंगराची काठी आणि बॅटरी सोबत ठेवा. कारण बिबट्या सहसा उजेडात येण्याचा प्रयत्न करत नाही आणि घुंगराच्या आवाजामुळे त्याला तुमची चाहूल लागेल आणि तो त्याचा मार्ग बदलेल.किंवा मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणे लावा.
२) बिबट्याने हल्ला केला की तो सर्वात पहिले तुमचा गळा पकडतो त्यामुळे चटकन माणूस जायबंदी होतो त्यामुळे सहसा बाहेर फिरताना गळ्यात मफलर टाकून बाहेर पडा.
३) बिबट्या हा नेहमी त्याच्या उंचीच्या आणि त्यांपेक्षा छोट्या उंचीच्या प्राण्यावर पटकन हल्ला करतो. म्हणून शक्यतो घराबाहेर शौचास जाणे टाळा. शौचालयाचा वापर करा. कारण शौचास बसलेले असताना त्याचा हल्ला होऊ शकतो.
४) बाहेर अंगणात झोपणे टाळा. अंगनाला जमल्यास तारेचे कुंपण घालून घ्या .
५) आपल्या सर्व जनावरांना बंदीस्त गोठ्यात ठेवा. जेणेकरून जनावरांवर बिबट्याचा हल्ला होणार नाही.
६) आपल्या घराच्या आसपास उरलेले शीळ अन्न फेकू नका.कारण तिथं आसपास चे कुत्रे जमा होतात आणि नेमका त्यावेळी त्यांच्यावर बिबट्याचा हल्ला होण्याची शकता असते.
७) आपल्या घराच्या चारही बाजूंनी मोठे लाईट लावा म्हणजे बिबट्या घराच्या जवळ येणार नाही.
८) घराच्या आसपास जर ऊस किंवा अन्य पीक उंच वाढले असेल तर ते कापा. घर ते पीक कमीत कमी २० फूट अंतर ठेवा.म्हणजे तो घरा जवळ लपून बसणार नाही.
९) जवळपास कुठ बिबट्याची पिल्ल दिसले तर त्यांच्याशी छेडछाड करू नका. तात्काळ वन विभागाला कळवा. कारण तिथेच जवळपास बिबट्या असू शकतो. तिथून लवकरात लवकर निघून जा.
१०) आपली लहान मुलांना एकट्याला बाहेर पडू देऊ नका.
११) समजा बिबट्या अचानक समोर आला तर जोरात ओरडा, हातातील काठी जोरात खाली आपटा, त्यावर टॉर्च मारा.
१२) कुठल्याही अफवा पसरवू नका आणि अफवा वर विश्वास ठेवू नका.
१३) समजा तुमचे घर जर फार एकांतात रानात असेल तर रात्री ७ वाजता क्या आसपास एखादा फ टाका फोडा म्हणजे तो त्या आवाजाने दूर पळून जाईन.
१४) सर्व काम शक्यतो दिवसाच करून घ्या रात्री बाहेर पडू नका.