Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

Big9news Network

सोलापूर जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला कोविड-१९ या आजारामध्ये रुग्णांची ऑक्सीजन पातळी कमी होते यामूळे ऑक्सीजनची गरज भासते. या अनुषंगाने तारस व स्वस्ती या संस्थेमार्फत क्रांती महिला संघ या संस्थेला आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये एकूण १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

यामध्ये ८ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशीन ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना देण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सीजनचा रुग्णांना पुरेपूर उपयोग होणार आहे.
त्याचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी व्हावा म्हणून क्रांती महिला संघ ही संस्था लोकअभियाना च्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.

सदर कार्यक्रमामध्ये डॉ. शितलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी,पुर्नवसन तहसिलदार अभिजित जाधव, स्वस्ती संस्थेचे विभागीय अधिकारी श्रीराम, क्रांती महिला संघाचे अध्यक्ष काशीबाई जाधव,ए.आर.टी. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस जिल्हा सुपरवायझर कृष्णा सकट, MSACS चे अधिकारी नागेश गंजी, व कार्यक्रम व्यवस्थापक रेणुका जाधव, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख व इतर संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *