आ. कल्याणशेट्टी यांना कोतवाल संघटनेचे निवेदन ;आमदार म्हणाले ..

अक्कलकोट तालुक्यातील कोतवाल संघटनेच्या वतीने आ सचिन कल्यांणशेट्टी निवेदन देण्यात आले, या निवेदनात सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल यांचा पदोन्नती चा विषय कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून, त्याबाबत वारंवार निवेदन, आंदोलन, संप करून देखील पदोन्नतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या ११ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात पदोन्नती झाली नसून, अक्कलकोट तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने आ सचिन कल्याणशेट्टी यांनी कोतवलांचा विषय जिल्हा प्रशासना पर्यंत पोहचवावा ह्या करिता निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी, आ कल्यांणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटून तुमचा विषय मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.


महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात दरवर्षी पदोन्नती देण्यात येते, फक्त सोलापूर जिल्ह्यातच पदोन्नती देण्यात आली नाही. हे पाहता कोतवाल कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असून, पदोन्नती चे वय ४५ वर्षाचे मर्यादा असल्याने जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदार, हलगर्जीपणा पणामुळे अनेक कोतवाल कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत.
या पदोन्नती बाबत आ सचिन कल्यांणशेट्टी यांनी कोतवलांचा विषय जिल्हा प्रशासना पर्यंत पोहचवून कोतवालाना न्याय मिळवून देण्याकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, तालुका अध्यक्ष शफील वाडीकर, सरचटणीस शिवानंद कोळी, उपाध्यक्ष रेवनसिद्ध सुतार, कार्याध्यक्ष शिवशरण कोळी, प्रसिद्धी प्रमुख प्रविणकुमार बाबर, स्वामींनाथ आलूरे, वीरभद्र स्वामी, सल्लागार हणमंत सानप, बसवराज गायकवाड, दीपक कांबळे, कोषाध्यक्ष सुनील मुलगे, महिला प्रतिनिधी सुचिता काळे, ममता कोळी, चौडप्पा कुंभार, सूर्यकांत रामपुरे, फिरोज तांबोळी, जाकीर कागदे, महादेव चव्हाण, मल्लिनाथ कलशेट्टी, यासह सर्व कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.