आज दि.28 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 813 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.
आज शुक्रवारी 28 मे रोजी ग्रामीण भागातील 813 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 472 पुरुष तर 341 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2035 आहे. यामध्ये 1156 पुरुष तर 869 महिलांचा समावेश होतो. आज 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 8409 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7596 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.