Big9news Network
कार्यकर्त्यांनी पदाच्या मोहात अडकू नये. कार्यकर्ता हेच मोठा पद आहे. राजकारणात व्यक्तिनिष्ठ न राहता पक्षनिष्ठ असावे. केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवावेत, ग्रामपंचाय निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
माळकवठे येथे भाजपचे समर्थ बुथ अभियान तसेच नूतन पदाधिकार्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती सोनाली कडते, उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, नूतन सरचिटणीस संगप्पा केरके, यतीन शहा, मळसिध्द मुगळे, अंबिका पाटील, दीपाली व्हनमाने, सुशीला ख्यामगोंडे, संदीप टेळे आदी उपस्थित होते. आ. देशमुख पुढे म्हणाले, आपण मंत्री असताना तालुक्यात गेल्या साठ वर्षांत झाली नाही इतकी विकासकामे पाच वर्षांत केली आहेत. वडापूर व वडकबाळ येथे बॅरेजेस, भीमा-सीना जोडकालवाच्या माध्यमातून सिंचनाचा प्रश्न सोडविण्यावर आपला भर आहे. केंद्र सरकार गोर-गरिबांसाठी, शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवित आहेत.
या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. पदामुळे तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली आहे. आता तुमच्या कार्याने पक्षाला प्रतिष्ठा मिळवून द्या. पराभवाने खेचून जाऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागा,पक्ष तुमच्या पाठिशी आहे. यावेळी मळसिध्द मुगळे,अंबिका पाटील यांचीही भाषणे झाले. सूत्रसंचालन शिवानंद बगले यांनी केले तर आभार प्रभाकर बिराजदार यांनी मानले. यावेळी जिल्हा सरचिटणीस हनुमंत कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
Leave a Reply