Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

मुंबई (Mumbai) विमानतळाबाहेर आज सोमवारी शिवसैनिकांनी तोडफोड केली. विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या ‘अदानी’फलकाला शिवसेनेनं विरोध दर्शवला असून कार्यकर्त्यांनी हा फलक हटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई विमानतळाचा ताबा अदानी समुहाकडे गेला आहे. त्यानंतर विमानतळाबाहेर ‘अदानी विमानतळ’ (adani airport) असे फलक लावले होते. यावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)

मुंबईचे विमानतळ GVK समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावाचे फलक लावण्यात आल्यानं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या उद्योगपतीच्या नावे विमानतळ ओळखलं जाणार असेल तर ते मान्य नाही, ते महाराजांच्या नावानेच ओळखलं जावं, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *