Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी 

आज दि.२/८/२०२१रोजी दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली माढा शहर व परिसरातील माजी राजकीय पदाधिकारी, माढा नगरपंचायतीचे नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या शिष्टमंडळाने माढा महाविद्यालयाची जुनी इमारत तहसील कार्यालयासाठी तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून देण्याबाबत माढा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढेरे यांना निवेदन दिले.

माढा महाविद्यालयाची जुनी इमारत तहसील कार्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबत तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व रयत शिक्षण संस्था यांच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली खूप धीम्या गतीने सुरू आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे पत्र व्यवहार होऊन देखील संस्थेकडून प्रतिसाद मिळत नसल्याची भावना कॉंग्रेस नेते दादासाहेब साठे यांनी यावेळी व्यक्त केली.

माढा महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत माढा परिसरातून दानशूर व्यक्तींनी काॅलेजला नेहमीच सहकार्य केले आहे.संस्थेने माढा शहर व परिसराच्या महत्वाच्या बाबी साठी सहकार्य करण्याची गरज आहे.माढा महाविद्यालयात नॅक (NAAC) ग्रेडिंग करिता युजीसी आयोगाकडून कमिटी येत्या दोन-तीन दिवसांत येणार आहे. त्या संदर्भात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व संचालक यावेळी उपस्थित राहणार आहेत. आज दिलेल्या निवेदनावर निर्णय न घेतल्यास नॅक कमिटीच्या भेटी दिवशी संस्था व्यस्थापनासमोर शहर व परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ भेटुन इमारतीसाठी आग्रही विनंती करणार असल्याचे दादासाहेब साठे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्र्वर,गंगाराम पवार, माजी नगरसेवक शहाजी साठे,समीर सापटणेकर, निलेश बंडगर, विजय सातपुते .आजिनाथ माळी, राजु साठे, उमेश साठे,जहीर मणेर, सचिन साबळे,दिनेश गाडेकर,सुधीर लंकेश्र्वर, संतोष जुगदार, रवि कथले, कुमार चवरे,अशोक जानराव, यु.एफ.जानराव ,भिवाजी जगदाळे,शिवाजी माने,गणेश साळुंके, नाना साठे,आक्रम कुरेशी,आदी माढा शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होता.

माढा शहरात तहसील कार्यालयास नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला असून सदर कार्यालयास तात्पुरत्या स्वरूपात इमारतीचे आवश्यकता आहे गेल्या काही महिन्यांपासून रयत संस्थेशी इमारतीसाठी प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार चालू आहे परंतु आजतागायत संस्थेने तहसील कार्यालयास इमारत देणे बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही इमारत देण्याबाबत निर्णय न घेतल्यास

आपल्या संस्थेचे कॉलेज भविष्या मध्ये चालू देणार नाही सदर कॉलेज चालू करण्यासाठी माढा शहरातील दानशूर व्यक्तींनी संस्थेला मोठे सहकार्य केले आहे . तरी माढा परिसरातील जनतेच्या भावनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जुनी इमारत उपलब्ध करून घ्यावी.

मिनल साठे
नगराध्यक्षा माढा नगरपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *