Big9news Network
कोरोना रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे मात्र शहर परिसरात लसींचा तुटवडा आहे .लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होतेय. आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आहे. त्यामुळे वार्ड तिथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने महापौरांकडे केली.
सोलापुरात सध्या कोरोनाचा (corona Virus)प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावर रामबाण उपाय म्हणून प्रशासन लसीकरण जलदगतीने करा म्हणून सांगतय मात्र लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने व लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या करिता आज भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने सभागृह नेते श्रीनिवास करली व महापौर श्रीकांचना यन्नम यांना भेटून खालील मागण्या करण्यात आल्या.यावेळी अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने,ओम होमकर,योगेश कबाडे,रोहित कोळकुर,शिवानंद येरटे,रोहित इटगी उपस्थित होते.
असे सुचवले उपाय..
वार्ड तिथे लसीकरण केंद्र सुरू करावे
ऑनलाइन नोंदणी व ऑफलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांची केंद्र वेगळी करावी जेणेकरून गोंधळ होणार नाही
लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेला परवानगी द्यावी जेणेकरून 1 तारखेपासून 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर गर्दी होणार नाही
लसी उपलब्ध नसल्यास नागरिकांना महापालिकेकडून कळविण्यासाठी यंत्रणा करावी जेणेकरून नागरिकांची केंद्रावर हेलपाटे व विनाकारण गर्दी होणार नाही.
यावेळी महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती शिष्टमंडळाने दिली.
Leave a Reply