Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

शहर परिसरात आज 2291 जणांची तपासणी केल्याचे अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 2059 जण निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त आहे, तर 232 जण पॉझिटिव्ह असल्याचे नोंद करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 492 इतकी आहे.
परंतु दिवसेंदिवस शहर परिसरात बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही एकाच दिवशी 19 जण बळी पडले आहेत. यामध्ये नऊ पुरुष तर दहा महिलांचा समावेश होतोय.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24,745 असून एकूण मृतांची संख्या 1080 इतकी आहे.  रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 3081 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 20,584 इतकी आहे.

महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत नागरिकांनी आजारपण अंगावर काढू नये. वृद्धांची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे, मास्क वापर करावा अशा सूचना देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *