Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

महेश हणमे /9890440480

सोलापूर शहरातील डफरीन चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी आपल्याला इंजेक्शन देऊन मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महेश कदम नावाच्या रुग्णाने केला आहे. या रुग्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झालाय. यावर रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. एका महिलेचा विनयभंग करून, हा कोरोना रुग्ण पळाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये कदम काय म्हणाले…
या व्हिडिओमध्ये महेश कदम म्हणतोय की, “22 एप्रिल रोजी मी या रुग्णालयात दाखल झालो होतो. माझ्या प्रकृतीमध्ये कसलाही फरक पडलेला नाही, रुग्णालयात चांगले उपचार होत नाहीत, केवळ पैसे भरायला सांगितले जात आहेत.”

ऑक्सीजन पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये द्या, व्हेंटिलेटर पाहिजे असेल तर दोन लाख रुपये द्या, औषधे-गोळ्या हव्या असतील तर दहा हजार रुपये द्या, असे सांगितले जाते. पाचशे रुपयाची वस्तू मागवायचे असेल तर दोन हजार रुपये मागितले जातात आणि डॉक्टरही भेटत नाही, बाथरूम मध्ये पाणी नाही याबद्दल रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रार ऐकून घेतली नाही. ‘तुझ्यासारखी खूप पाहिले आहेत, राहू वाटले तर राहा अन्यथा निघून जा’, असे सांगितले. आम्ही इंजेक्शन देऊन तुमच्यासारख्या अनेकांना मारले आहे अशी धमकी दिली. तुला उपचार घ्यायचे असतील तर घे, तू आमच्या हॉस्पिटलचे काही वाकडे करू शकत नाही, अशी भाषा वापरली. दहा ते पंधरा लोकांचा स्टाफ घेऊन अंगावर मारायला येतात, डिस्चार्ज द्या म्हटलं तरी देत नाहीत, मला त्वरित डिस्चार्ज मिळावा अशी मागणी या तरुणाने केली आहे. त्यामुळे मी आत्मदहन करेन असाही इशारा व्हिडिओमध्ये दिलेला होता. काल मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

महेश कदम

काल रात्री नर्मदा हॉस्पिटलची बाजू मांडताना मॅनेजर रुपनर यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देतो असे सांगितले होते.

नर्मदा हॉस्पिटल प्रशासनाने मांडलेली बाजू –

आमच्या हॉस्पिटलमध्ये महेश कदम नावाचा कोविड पेशंट हा दि. २५/०४/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अॅडमिट झाला. आमच्या हॉस्पीटलमध्ये या पेशन्टवर उपचार करत असताना सदर पेशन्ट उपचाराला प्रतिसाद देत नव्हता, म्हणजेच औषधे वेळेवर घेत नव्हता. नर्सिंग स्टाफ आणि वार्डबॉय/मावशी यांच्याशी काहीतरी कारणे काढून वादविवाद करत गलिच्छ वर्तन करीत असतो, मॅनेजरांनी वेळोवेळी सहानुभूतीपूर्वक धीर देवून त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. तरी त्याच्या वर्तनात काहीच फरक पडला नाही.

त्यानंतर दि. २८/०४/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता एका महिला हाऊसमन डॉक्टरसोबत त्या पेशन्टने वादविवाद केला. त्यानंतर हॉस्पीटलचे मॅनेजर त्या पेशन्टला समजवून सांगण्यासाठी गेले असता, त्यांनाही शिवीगाळ व उलट-सुलत बोलून मी पत्रकार आहे, तुमच्या हॉस्पीटलची बातमी चॅनलला लावून बदनामी करेल अशी धमकी दिली. त्यानंतर महिला नर्सिंग स्टाफ इंजेक्शन देण्यास गेले असता त्या पेशन्टने त्या महिला नर्सिंग स्टाफचा हात पकडला. त्यावेळी त्या महिला नर्सिंग स्टाफने आरडा-ओरडा केल्यानंतर हॉस्पीटलमधील सर्व कर्मचारी जमा झाले. ते पाहून त्या पेशन्टने हॉस्पीटलमधून पलायन केले. सदरचा पेशन्ट हॉस्पीटल मधून पळून गेल्यानंतर त्याची तक्रार व माहिती हॉस्पीटलने सदर बझार पोलिस स्टेशनला कळविली.

तसेच घटनेवेळी हॉस्पीटलमधील महिला नर्सिंग स्टाफ सदर महेश कदम नामक पेशन्टला समजवून सागून व धीर देत उपचार करीत असताना त्या संबंधीत महिला नर्सिंग स्टाफ सोबत अश्लील वर्तन करीत हात पकडून स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला त्या संबंधी हॉस्पीटल व्यवस्थापकांनी घडलेल्या घटनाबाबत महेश कदम यांच्याशी चौकशी केले असता चौकशीस उत्तर न देता उलट धमकावले व मी पत्रकार आहे मला जाब विचारणारे तुम्ही कोण माझ्या एका स्टेटमेन्टमुळे हॉस्पीटलची बदनामी होऊ शकते, बंद पडू शकते असे धमकावले त्यामुळे नाइलाजास्तव हतबल होवून महिला नर्सिंग स्टाफना महेश कदम विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागला व तो गुन्हा सदर बझार पोलिस स्टेशनला दाखल झालेला आहे. त्यानंतर सायंकाळी तो रुग्ण पळून गेला व काही वेळातच माय मराठी नावाच्या युट्युब चॅनलवरुन (YouTube Channel) बदनामी कारक, हॉस्पीटलमधील उपचार पद्धतीबद्दल अफवा पसरवणाऱ्या स्वताः तयार केलेला व्हिडीओ वेगवेगळ्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून वायरल केल्याचे दिसून येते,

तरी संपूर्ण घटनेबद्दल हॉस्पीटलकडून खुलासा की, नर्मदा हॉस्पीटल ही गेल्यसा ६ वर्षापासून सोलापूरकराच्या सेवेत आहे. अविरत सेवा देत आहोत. आज पर्यंतच्या कोविड काळात सुमारे २ ते ३ हजार पेशन्टवर उपचार केलेली आहे. तरी आजवर कुठल्याही पेशन्टनी हॉस्पीटलवर व डॉक्टर व व्यवस्थापन विरुद्ध कुठलीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे कालची घटना ही निव्वळ हेतूपुरतसर बदनाम करण्यासाठी केलेली आहे.

तरी कोविडची महामारी संपूर्ण जगात चालू असताना हॉस्पीटलमधील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्र-दिवस रुग्णाची सेवा करीत आहेत. मात्र, या रुग्णाकडून हॉस्पीटलची कुठल्या उद्देशाने बदनामी केली हे कळून येत नाही. या प्रकारामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे मनोबल कमी करण्याचे प्रयत्न हेतूपरस्पर केला जात आहे. या प्रकारामुळे रात्र-दिवस आपला जीव धोक्यात घालून काम करणारे कर्मचारी घाबरून गेले आहेत व सदर खुलासा आम्ही आपल्या माहितीसाठी सादर करीत आहोत.

विजय रूपनर, व्यवस्थापक नर्मदा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल 

   नर्मदा हॉस्पिटल संदर्भातील व्हिडिओ मी पाहिला आहे. थोड्याच वेळात हॉस्पिटल स्थळी जाऊन भेट देणार असून तेथील पाहणी केली जाईल. त्यानुसार पुढील माहिती देण्यात येईल

धनराज पांडे, उपायुक्त, सोलापूर महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *