Big9news Network
उस्मानाबाद तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या तेरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तेरणा धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे धरणा खालोखाल असलेल्या तेरणा नदीला याआधी कधी नव्हे तो मोठ्या प्रमाणात पूर आल्याने तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या तेर गावांत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसल्याने अनेक नागरिकांच्या घरांत तसेच दुकानात पाणी शिरले होते.
त्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्यांचे तसेच दुकानातील साहित्यासह मालाचे मोठे नुकसान झाले तसेच तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उस्मानाबाद लातूर महामार्ग सायंकाळी उशिरापर्यंत तेर येथे बंद पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली तसेच नृसिंह वेस येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या इमारतीला तसेच ग्रामीण रुग्णालयास पुर्णपणे पुराच्या पाण्याचा विळखा पडला असल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी उस्मानाबादला पाठविण्यात आले तर रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुक्मिणी मंगल कार्यालयात स्थलांतरित करुन याच ठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे तर जुने बसस्थानक ते नवीन बसस्थानक या पाचशे मिटर रस्त्यावर गुडघाभर पाणी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तसेच गावातील अनेक भागातील विद्युत डिपी पाण्यात असल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता
Leave a Reply