‘सिव्हिल’चे अस्थायी डॉक्टर जाणार सामूहिक रजेवर

सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात( सिव्हिल हॉस्पिटल)30 डॉक्टरचे अस्थायी स्वरूपात अध्यापन रुग्णसेवेचे काम करत आहेत. शासकीय सेवेत कायम करण्याचा मागणीसाठी गुरुवार 29 एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाणार आहेत.
महाराष्ट्रातील एकूण 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे 450 विभागीय निवड मंडळामार्फत नियुक्त असलेले सहाय्यक प्राध्यापक अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. डॉक्टरांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी 15 एप्रिल रोजी सामूहिक रजा आंदोलन केले होते. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दहा दिवसात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. ही मदत संपून मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या बैठकीत अस्थायी डॉक्टरांच्या कायम सेवेविषयी निर्णय झाला नाही. त्यामुळे अस्थायी डॉक्टर ये 29 एप्रिल पासून सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. या आशयाचे निवेदन अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांना देण्यात आले.
OPD, शस्त्रक्रिया, covid A-ब्लॉक व covid B-ब्लॉक हे याच डॉक्टरांवर अवलंबून आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त जागा न भरल्याने अन्याय झाल्याची भावना डॉक्टरांची आहे.29 एप्रिल पासून डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यास सिव्हिल ची यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.