Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे डॉ.बसवराज रंगनाथ लोहारे यांनी आरोग्याधिकारी पदाचा पदभार दिनांक २/९/२०२१रोजी ग्रहण केला.त्यानंतर आरोग्य अधिकारी यांनी महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांची भेट घेतली.

डॉ. बसवराज लोहारे यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषद येथील टेंभुर्णी प्रा.आ.केंद्र येथे ५ वर्षे वैद्यकिय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. तदनंतर ग्रामीण रुग्णालय, पनवेल येथे २ वर्षे वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकिय अधीक्षक म्हणून ७ वर्षे कामकाज पाहिले आहे. पनवेल महानगरपालिका येथे आरोग्याधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देखील सहा महिने त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडला असून, त्यांची ठाणे जिल्हा क्षयरोग विभाग येथे नियुक्ती करण्यात आलेली होती.

डॉ.बसवराज लोहारे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण डॉ. डि. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून झालेले असून, पदव्यूत्तर शिक्षण मुंबई येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, सायन येथुन पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *