Big9news Network
२४ तासामध्ये सोलापूर शहरामध्ये घरफोडी करणारा आरोपी निष्पन्न करून त्यास जेरबंद केले. गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांची कामगिरी आरोपी कडून चोरीस गेलेला १००% मुददेगाल हस्तगत • आरोपीकडून एकूण १,८५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त
सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये सोलापुर शहरात घर फोडी चोरीचे विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो, सोलापूर शहर श्री. अंकुश शिंदे सो व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / विशा) श्री. बापू बांगर सो यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय साळुंखे सो यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्यांचा अभ्यास करून तसेच अभिलेखावरील आरोपी
तपासून गुन्हे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप शिंदे व त्यांचे पथकातील पोलीस कर्मचारी असे दि.२८/०६/२०२१ रोजी अभिलेखावरील पाहिजे फरारी आरोपीचा शोध कामी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात तारेचे बंडल आरोपी साठी रिक्षा मथुन पंचकहा परिसरामध्ये येणार असल्याची गोपनीय खात्रीशीर
मिळाली होती. पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप शिंदे व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी पंचकट्टा येथे सापळा लावला असता विजापुर बेस कडुन एक रिक्षा येताना दिसली बातमी प्रमाणे सदर रिक्षाचा संशय आल्याने पोलीस उप निरीक्षक श्री संदिप शिंदे व त्यांचे पथकाने त्यास थांगण्याचा इशारा केला असता सदर इसम रिक्षा तेथेच सोडून जाणेचा प्रयत्न करीत असताना मोठ्या शिफातीने त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता, त्यांने आपले नाव गालीब इसामोद्दीन शेख वय ४० वर्षे रा. सांखरपेठ सोलापूर असे सांगीतले. त्यानंतर त्यास रिक्षामध्ये असलेल्या तारांचे बंडल बाबत विचारणा करता त्याने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु त्यास विश्वासात घेऊन तपास करता त्याने ०१ इलेक्ट्रीक फाटा व ०४ तारेचे बंडल असा मुददेमाला सदर बझार पोलीस ठाणे हददीतील रेल्वे लाईन जवळ श्रद्धा एम्पायर तोलापूर शहर येथे असलेल्या संदीप स्टील मार्ट या दुकानाचे पत्यावरुन आत प्रवेश करुन चोरी केली असल्याचे सांगीतलेने नमुद आरोपीकडुन घरफोडीचे गुन्हयातील तारेचे बंडल व इलेक्ट्रीक काटा हस्तगत केला आहे.
सदर बझार पोलीस स्टेशन गु.र.नं.४१३/२०२१ भादवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे दाखल गुन्हयाचा उत्कृष्टपणे तपास करून मोठया शिताफिने गुन्हयात गेलेला १००% मुद्देमाल च गुन्हयाचे कामी वापरण्यात आले रिक्षा असा एकुण १.८५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून गुन्हा दाखल झाले पासुन २४ तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करून उघडकीस आणला आहे.
“सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, सोलापूर शहर श्री. अंकुश शिंदे सो, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/दिशा) श्री.बापु बांगर, वयोनि (गुन्हे) श्री. संजय साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. शिंदे, पोह/अजय पाडवी, पोना/कृष्णात कोळी, राजकुमार पवार, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड, कुमार शेळ पोकॉ. गणेश शिंदे, चापोना/संजय काकडे यांनी पार पाडली.