ग्रामीण | आज पर्यंत बरे झालेल्यांची संख्या 1,13,780; तर आजचे बाधित रुग्ण 730

Big9news Network

आज दि.30 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 730 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज रविवारी 30 मे रोजी ग्रामीण भागातील 730 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये  पुरुष 396 तर 334 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1798 आहे. यामध्ये 1059 पुरुष तर 739 महिलांचा समावेश होतो. आज 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 8748 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8018 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.