Big9news Network
सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरातील भारत नगर येथील रहिवासी असलेल्या युसूफ शेख यांचा मुलगा तोसिफ शेख 19 जुलै पासून बेपत्ता आहे. तरी तो कुठे आढळून आल्यास माहिती कळवावी असे आवाहन त्याच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
यात हकीकत अशी की एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता नामे तोसिफ युसुफ शेख हा दिनांक 19 जुलै रोजी राहत्या घरातून सोबत कपडे घेऊन दोन दिवसात येतो असे सांगून निघून गेला. त्याचा नातेवाईकाकडे आणि सर्व ठिकाणी शोध घेतला असता मिळून आला नाही. म्हणून अर्जदार युसुफ शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर 87/2021 प्रमाणे बेपत्ता झाल्याचे नोंद केली आहे. सदर इसम हा कोणास आढळल्यास तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन एमआयडीसी पोलिसांनी देखील केले आहे.