Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

Big9news Network

Our schools are all geared up to bolster the free vaccination drive for the 15-18 age group.On Monday, reviewed the preparedness of the vaccination drive across districts in the presence of senior officials,districts Collectors/Commissioners, local education & public health staff.

राज्यातील शाळा १५-१८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. लसीकरणाच्या नियोजनाबाबत शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी/आयुक्त, जिल्हा शिक्षण आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या तरूण विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर 100 % लसीकरण व्हावे यासाठी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन चांगल्या समन्वयाने काम करत आहेत. अनेक जिल्ह्यांनी जानेवारी महिन्यातच विद्यार्थ्यांना पहिली लस देण्याचे उद्दीष्ट मांडले आहे.

‘SOPs चे काटेकोर पालन करा’ –

विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. बैठकीदरम्यान शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या कोव्हीड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे (SOPs) काटेकोपरपणे पालन करण्याची सूचना तसेच गर्दीचे उपक्रम टाळण्याचे निर्देश मी पुन्हा अधोरेखीत केले.

स्थानिक पातळीवर संक्रमणाची परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आधीच देण्यात आले आहेत. उस्मानाबाद, चंद्रपूर,सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यांतील शाळेत जपानी मेंदूज्वर या आजारावरील लसीकरण सुरू आहे. या जिल्ह्यांत कोव्हॅक्सीनचे लसीकरण करण्यासाठी आणखी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे माझ्या निदर्शनास आणून देण्यात आले. यासंदर्भात आरोग्य विभागाशी चर्चा करण्यात येईल. या महामारीचा निःपात करण्यासाठी आपण एकजूट होऊन लढा देऊ. मास्क वापरा, लसवंत व्हा, अंतरभान ठेवा आणि गर्दी टाळा.

Maharashtra DGIPR
SCERT,Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *