Big9news Network
सोलापुरातील हाॅटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम राबविला जातो आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आले असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.
यंदाही सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यासाठी सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत सोलापूरकरांनी जमा केलेल्या जीवनावश्यक वस्तू सर्व एकत्र करुन प्रत्येक कुटुंबाला बॅग ऑफ होप च्या माध्यमातून जवळपास २००० पेक्षा जास्त लोकांना पंधरा दिवस पुरेल इतके साहित्य पाठविण्यासाठी तयारी केल्याची माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली.
सर्व पूरग्रस्त भागाचा विचार करता आपली मदत योग्य व दुर्लक्षित ठिकाणी पोहचवावी या उद्देशाने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये घरोघरी कुटुंबाना मदत पोहचविणार असून एका बॅग मध्ये साडी, लहान मुलांचे ड्रेस, बनियन, चड्डी, छत्री, चादर, ब्रश पेस्ट, साबण, गहू, तांदूळ , डाळ, साखर, बिस्किटे, सुगंधीदुध, मॅगी, सॅनिटरी नॅपकिन, मिठ, फरसाणा, पाण्याच्या बाटल्या, चाॅकलेट, वेफर्स, मास्क व राजगिरा लाडू असे जीवनावश्यक साहीत्य बॅग ऑफ होप या उपक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्त परीवारांना मदत पोहचविण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी आतापर्यंत महेंद्र होमकर, विनायक पवार, प्रसन्न तंबाके, स्मिता क्षीरसागर, आशिष जैन, ओंकार शिर्के, सुनिता साबळे, तृप्ती बटाले,दिनेश लोमटे, अमित सोनी, सुमित रघोजी, प्रमोद सोरटे, नागेश पिसे, मल्लिनाथ जोगडे, प्रियांका वडनाल, सौम्या कोदी, मंदार नीळ, नरेश सुनकनपल्ली, जयेश रामावत, पंकज जैन, राहुल शिंदे, संजय देशमुख, शुभम हेबळकर, धनाजी नीळ, सिद्धराम कंकरे, दिग्विजय ढेपे, भारत राज पुरोहित, स्वाती जाधव, धिरज वाघमोडे, सुमित पंडित, पद्मशाली इंटरनॅशनल फाऊंडेशन, राजनंदीनी पटणे, अर्चना आगाव,सनी बिकचंदाणी, विनायक चिटमील, विलास खताळ, राधिका महींद्रकर, मोनाली सावस्कर, पल्लवी सावस्कर, अंजना कोने, अश्विनकुमार कुंटला, मयुर गुंडेली, शुभम हंचाटे, शांतेश स्वामी, संगमेश स्वामी, प्रणव देशमुख, मिलिंद मायनकर, प्रा.वासंती अय्यर, प्रविण जवळकर, राहुल स्वामी, अभिषेक सुळ, यश सुरवसे, विनायक बबलादी, राजश्री देशपांडे, कल्पना देशपांडे, प्रिती, आफरीन, मानसी, राजेश्वरी,ऐश्वर्या यांनी योगदान दिले आहे.
सर्व जमा जीवनावश्यक साहीत्य प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्ररित्या पोहचविण्यासाठी बॅग ऑफ होप चे पॅकिंग प्रेम भोगडे, अमोल गुंड, विघ्नेश माने, डोंगरेश चाबुकस्वार, समर्थ उबाळे, लक्ष्मीकांत निंबाळे व हिंदुराव गोरे यांनी केले.