‘राजकारणातील भीष्माचार्य ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रमिकांचा लाल सलाम’ – नरसय्या आडम (मास्तर)

Big9news Network

मला गणपतराव देशमुख यांच्या सोबत 1978 आणि 2004 साली विधानसभेच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली.तब्बल 11 वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा बजावलेले देशमुख सांगोला च्या माळरानावर महिलांसाठी सूत गिरणी उभारून स्वावलंबी व समर्थ बनवणारे प्रजाहितदक्ष व निष्कलंक नेते होते.

आपली प्रतिभाशक्ती व प्रगल्भतेने सत्ताधारी यांच्यावर अंकुश ठेवणे आणि विरोधकांना कोंडीत पकडणे याचे उत्तम कौशल्य असणारे उत्कृष्ट विधानसभापटू गणपतराव देशमुख यांच्या निधनाने उभा महाराष्ट्र पोरका झाला. विधानसभा शिष्टाचार काटेकोर पणे पालन करणारे जाणकार आणिमार्क्सवादारावर पकड असणारे मुत्सद्दी महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य ज्येष्ठ नेते यांना श्रमिकांचा लाल सलाम !