Big 9 News Network
घरगुती कारणातून दारूच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून निर्घुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना,संजय गांधी नगरातील दोन नंबर झोपडपट्टी येथे घडली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. शरणव्वा दत्तप्पा गोळसर(वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सिद्धाराम दत्तप्पा गोळसर (वय३२) या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या तीन ते चार दिवसांपासून संशयित आरोपी सिद्धाराम गोळसर आपल्या आईशी दारू पिऊन वाद घालत होता. गेल्या तीन दिवसांपासून सारखे भांडण सुरू होते. सोमवारी दुपारी सिद्धाराम याने आईच्या डोक्यात सिलेंडर घातले. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
हातावर जाळलेले डाग
मृतदेहाच्या दोन्ही हाताच्या कोपरावर जळलेले डाग दिसून येत होते. सोबतच पायावर ही जळलेले निशान होते. डोळ्यांवर मार बसल्यामुळे डोळे काळे निळे झाले होते. यामुळे डोळ्यांना सुज झाल्याचे दिसून येत होते. सोबतच घरात एका बाजूस सिलेंडर ची टाकी आडवी पडली होती. तसेच एक पांढरा रंगाचा शर्ट अर्धवट जळलेल्या अवस्थेत होता व घरातील कुलर आडवा पडला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्यावेळी आरोपी हा घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांनी त्याची विचारपूस केली.त्यावेळी नशेमध्ये तो पोलिसांनाही उलट उत्तरे देत होता. तुम्ही कोणीही माझ्या आईच्या मृतदेहाला हात लावू नका. इथून तिला घेऊन जाऊ नका असं म्हणत आरडा-ओरड करत होता. अत्यंसंस्कार आम्ही सर्व बांधव मिळून करु असे तो म्हणत होता. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी पाठवून दिला.
Leave a Reply