मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील प्रसिद्ध चिवडा व चहाच्या जननी रुक्मिणी ताई खताळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंचक्रोशीत ताई या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. मक्यापासून चिवडा बनवण्याची प्रक्रिया त्यांनीच सुरू केली.
नामांकित हॉटेल जयशंकरचे सर्वेसर्वा तथा अनेक पुरस्कारांनी सन्मानित यशस्वी महिला उद्योजक रुक्मिणी शंकर खताळ यांचे आज मंगळवारी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. मक्यापासून चिवडा बनवणे यामध्ये त्यांची हातोटी होती. संपूर्ण राज्यभरात या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांसाठी लांबोटीचा चहा आणि चिवडा आणि विश्रांती साठी हे ठरलेले स्थळ आहे.
सोलापूर जिप सदस्य कै. तानाजी खताळ यांच्या त्या मातोश्री होत. जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांचा 1 महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. हा सर्वात मोठा धक्का खताळ कुटुंबीयांवर होता त्या धक्क्यातून अजूनही हे कुटुंब सावरलेले नाही. रुक्मिणीताईंनी यांनी मोठ्या परिश्रमाने सोलापूर-पुणे महामार्गावर लांबोटी जवळ एका लहान टपरी मध्ये चहाचा व्यवसाय सुरू केला होता. येथून जाणारा प्रवासी आणि वाहन चालक त्याठिकाणी असलेल्या विविध प्रकारच्या चटण्या आवर्जून घेऊन जातो. अशा या प्रसिद्ध आणि मोठ्या कष्टाने उभा राहिलेल्या उद्योजिका रुक्मिणीताई खताळ यांच्या निधनाने संपूर्ण मोहोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील प्रसिद्ध चिवडा व चहाचे नामांकित हॉटेल जय शंकरचे सर्वेसर्वा तथा अनेक पुरस्कारांनी सन्मानित यशस्वी महिला उद्योजक रुक्मिणी शंकर खताळ यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. जिप सदस्य कै. तानाजी खताळ यांच्या त्या मातोश्री होत.
Leave a Reply