Big9news Network
आज दि.6 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 457 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.
आज रविवारी 6 जून रोजी ग्रामीण भागातील 457 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 242 पुरुष तर 215 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 734 आहे. यामध्ये 403 पुरुष तर 331 महिलांचा समावेश होतो. आज 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 17,175 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 16,718 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.