स्वतःची काळजी घ्या, प्रशासन तुमची काळजी करण्यास सक्षम : सीईओ स्वामी

आज सीईओ स्वामी यांनी हिरज ग्रामस्थांना तान तनाव मुक्ती या विषयावर प्रबोधन केले. हिरज येथील भवानी मंदिराच्या प्रांगणात ताण तणाव व्यवस्थापन विषयावर सीईओ स्वामी यांचे प्रबोधनपर भाषण झाले यावेळी सीईओ स्वामी बोलत होते. तुम्ही मनाने खंबीर रहा, कोरोना विषयक शासनाचे सर्व नियम पाळा. कोरोना झाला तरी घाबरू नका प्रशासन तुमची काळजी घ्यायला सक्षम आहे. यावेळी उत्तर सोलापूर तालुका गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख, हिरज गावचे सरपंच पिलाई पटेल, तिर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोडसे, ग्रामसेवक नंदकुमार पाटील, जि.प.प्राथमिक शिक्षक राठोड व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलताना सीईओ स्वामी म्हणाले की मनाने खंबीर माणसाला आजार काही करु शकत नाही. कोरोना हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे त्यामुळे घाबरून न जाता त्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामोरे जा. आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. कोरोनाने जे मृत पावले ते मनाने निश्चितच कमकुवत होते. कोरोनाने बरे झालेल्या लोकांचे प्रमाण पहा म्हणजे कळेल की हा आजार फार काही गंभीर नाही.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच पटेल यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.गोडसे यांनी मानले. यावेळी सीईओ स्वामी यांनी गावातून फेरी मारुन गावच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.