अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं -AIMS

Big 9 News Network

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने दिलं आहे. (Chhota Rajan COVID-19). अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याला कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज त्याचं निधन झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पण छोटा राजन जिवंत असल्याची माहिती AIIMS ने दिलं आहे.

तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.