सोलापूर:कोरोना महामारीच्या रूपाने आलेले संकट टळावे यासाठी सोलापूरातील ३५० सिंधी बांधवांनी एकत्र येऊन जप सुरू केला आहे. विशेष म्हणजे २४ तास हा जप सुरू आहे.
अमृतवेला ट्रस्टचे संस्थापक गुरूप्रीतसिंह रिंकू वीरजी यांच्या सूचनेनुसार भारतासह जगभरात तब्बल ५०० केंद्रांवर हा जप सुरू आहे. श्री गुरुनानकदेवजी यांचे स्वरूप असलेल्या श्री गुरूग्रंथसाहीबजीमधील श्री सुखमणी साहिबजी व जपजी साहिबजी यांचा अखंड पाठ सुरू आहे. यासाठी सोलापूरात साई गार्डन, नवजीवन हॉल आणि श्री गुरुनानक दरबार अशी तीन केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी एक मे रोजी सुरू झालेला जप १३ जून पर्यंत अखंड २४ तास सुरू राहणार आहे. एकावेळी एक केंद्रावर तीन जण दीड तास जप करतात. त्यांचा दीड तासाचा जप झाल्यानंतर पुढील तीन जण दीड तास जप करण्यात. अशा प्रकारे तीनही केंद्रांवर मिळून ३५० सिंधी बांधव जग कोरोनामुक्त व्हावे यासाठी हा जप करीत आहेत.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमृतवेला ट्रस्ट सोलापूरचे हरिष कुकरेजा, योगेश रावलानी, इंदरलाल होतवानी आदी परिश्रम घेत आहेत.
अमृतवेला ट्रस्ट सोलापूरचा उपक्रम