‘मनोरा’ आमदार निवासासाठी 900 कोटींची निविदा ; नेटिझन्सची टीका

महेश हणमे /9890440480

राज्य सरकारने ‘मनोरा’ आमदार निवासाच्या
पुनर्बांधणीसाठी 900 कोटींची निविदा काढलेली आहे. यावर समाज माध्यमांमधून टीकेची झोड उठली आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दहा दिवसात मृत्यू दरामध्ये देशाने अमेरिकेला मागे टाकले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार उधळपट्टी करत असल्याची खरमरीत टीका नेटीझन्स करत आहेत.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांचा सल्ला

मनोरा निवासावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला ट्वीट करून सल्ला दिलाय.लोकप्रतिनिधींपेक्षा आरोग्य सुविधांवर खर्च करा असा टोला त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना हा खर्च दिसला नाही का? असा सवाल करून सांगा, जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं.. असे ट्विट त्यांनी केलं आहे.

सोशल मीडियावर टीका
900 कोटीची निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणाऱ्या सरकारला आरोग्यसुविधाकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही का ?
राज्यात कोरोना आहे बर का ?
कडक लॉकडाऊन,अति कडक निर्बंध, जनसामान्य वेठीस तर शासन निविदा काढण्यात व्यस्त अशी टीकेची झोड उठली आहे.