- विडी कामगारांकरीता कारखान्यातच मोफत अँटीजेन टेस्ट संपन्न
- आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने आयोजन
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूरातील विडी कामगारांकरीता सोमवार, दि. 07 जून 2021 रोजी सकाळी 07 ते सकाळी 10 पर्यंत विडी कामगारांकरीता 1) ठाकूर सावदेकर विडी कारखाना, 2) लंगर विडी कारखाना व 3) साबळे टोबॉको विडी कारखाना येथे मोफत अँटीजेन टेस्ट करण्याची सोय करण्यात आली होती. यामध्ये 600 विडी कामगारांची चाचणी करण्यात आली.
यामध्ये सोलापूरातील सर्व विडी कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील सर्व कामगारांचे कोव्हिड-19 अँटीजेन टेस्ट करून घेतले. यामुळे सदर कामगारांना विडी कारखान्यामध्ये जावून विडीचे माप घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे सोलापूरातील शेकडो गोर-गरीब विडी कामगारांना अत्यंत मोलाची मदत झाली असल्याने अनेकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आधार मानले. यावेळी सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे, तिरुपती परकीपंडला व बहुसंख्य विडी कामगार उपस्थित होते.
Leave a Reply