Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

Big9news Network

मुंबई अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. त्या बरोबरच मुंबई-पुणे हैद्राबाद, मुंबई-नाशिक- नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असून सविस्तर प्रकल्प अहवाल आठ ते दहा महिन्यात सादर होणार आहे. वेगवान रेल्वे प्रवासासाठी व मुंबईसह महत्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबई ते अहमदाबाद बरोबरच मुंबई ते हैद्राबाद आणि मुंबई ते नागपूर या मार्गावरही बुलेट ट्रेन सुरु करण्याचे नियोजन आहे.

या दोन्ही प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या आठ ते दहा महिन्यात तो सादर केला जाईल. मुंबई-पुणे- हैद्राबाद, सोलापूर, गुलबर्गा बुलेट ट्रेन या ६५० किलोमीटर मार्गावर विमानाने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी ४ महिने लागणार आहेत.

ही बुलेट ट्रेन कामशेत, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, हैदराबादशी जोडले जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडकला आहे. महाराष्ट्रात अवघे २४ टक्के पर्यंतच भूसंपान झाल्याने व वांद्रे कुर्ला संकु ल येथे स्थानक उभारणीसाठीही जागा नाही. त्यामुळे काम ठप्प पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *