ऑक्सिजनचा सूक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या संशोधकाचाच अंतिमक्षणी ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू

Big 9 News Network

ऑक्सिजनचा सूक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या संशोधकाचाच अखेरच्या क्षणी ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला . कोल्हापूरचे ज्येष्ठ संशोधक प्रा . डॉ . भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत कोरोनाने बळी घेतला . जीवघेण्या आजारात ऑक्सिजनची संजीवनी देऊन जीवदान देणाऱ्या हा दिग्गज संशोधक वयाच्या 44 व्या वर्षातच ऑक्सिजनच्या कमतरतेचा बळी ठरला , ही बाब तमाम कोल्हापूरकरांनाही चटका लावणारी आहे . काही दिवसापूर्वी त्यांना करोनाची बाधा झाली . किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले . पण , एक दिवस प्रकृती बिघडल्या ने त्यांना चेन्नई येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले . दोन दिवस त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते . त्यांची प्रकृती सुधारली होती . त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते . पण , मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला . यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला . त्यामध्ये काकडे यांचाही समावेश होता . ऑक्सिजनच्या दिग्गज संशोधकाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली . पण त्या प्रयत्यांनाही अपयशच पाहावे लागले .
रसायनशास्त्रातली उच्चपदवी घेऊन त्यांनी संशोधन सुरू केले . जगभरातील अनेक देशांनी दिलेली ऑफर नाकारून त्यांनी भारतातच संशोधन करण्याचा निर्णय घेतला . सध्या ते चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत प्राध्यापक व संशोधक म्हणून कार्यरत होते . त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत संशोधक म्हणून काम करत होत्या . डॉ . काकडे हे शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेऊन फेलोशीप मिळवून पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा , जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले . त्यातून निर्माण होणार्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल , याचा ध्यास घेतला . वीस वर्षे त्यांनी या संशोधनात व्यतित केली . ऑक्सिजन , हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही धावू शकेल , असे संशोधन त्यांनी सुरू केले आणि जाताजाताच इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंट ही मिळवले.