Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

पंढरपुरात पोटनिवडणुकीनंतर कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या निवडणूक प्रक्रियेत सामील झालेल्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सांगोला तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील आई, वडील आणि मावशीचा मृत्यू झाला.पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. इथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद यांच्यावर सुरुवातीला सांगोला इथे उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई इथे हलवले. मात्र प्रयत्नांची शिकस्त करुनही प्रमोद यांचे निधन झाले.यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुलाने कोरोनावर मात केली. परंतु या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रशासन, राजकीय नेत्यांनी फारसे गांभीर्याने न घेण्याची मोठी चूक केली आणि त्याच काळात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे सुरु होते. परिणामी पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *