शेतकऱ्यांनी केला ११हजारांसह कपड्यांचा आहेर ; नेमकं काय घडलं

BIG 9 NEWS NETWORK

●पिकविमा मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी केला अकरा हजारासह कपड्यांचा आहेर.

●राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन…गायकवाड.

बार्शी(प्रतिनिधी)दि.८जून

गेल्या बारा वर्षापासून शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देणारे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी राज्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पिकविमा मिळवून दिल्याबद्दल बार्शी तालुक्यातील शिराळे गावात अकरा हजाराच्या रोख रकमेसह कपड्यांचा आहेर करून जाहीर सत्कार करण्यात आला.

त्यावेळी गायकवाड म्हणाले की, अजूनही राज्यातील अनेक शेतकरी विमा भरपाई पासून वंचीत असल्याचे फोन येत आहेत त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांना भरपाई जमा करण्यास भाग पाडावे अन्यथा सोहळा जून पासून संबंधित सर्व राज्यस्तरिय कार्यालयासह विमा कंपनीच्या मालकाच्या घरावरही आंदोलने केली जातील असा खणखणीत इशाराही शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.

,त्यावेळी दयानंद चौधरी, गोटू पाटील, अरविंद चौधरी, बजिरंग चौधरी, नितीन कदम, बाजीराव चौधरी, श्रीहरी गायकवाड, सिध्दार्थ चौधरी, समाधान पाटील, अक्षय मते, सुरज चौधरी, सुरेश चौधरी, विठ्ठल पाटील, मधूकर चौधरी, निलेश चौधरी, नृसिंग अंकुशे, बालाजी चौधरी, राजेंद्र फरताडे, अनिल सावंत, आबा तानवडे आदींसह पंचक्रोशितील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.