Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर : –  सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्याबद्दल अपशब्द वापरून राष्ट्रद्रोही वर्तन केले आहे,त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि पद्मश्री पुरस्कार तात्काळ मागे घ्या,अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
अज्ञानपणाचे वर्तन करून देशाविरुध्द बेताल वक्तव्य करणाऱ्या सिने अभिनेत्री कंगना राणावतची या देशात राहण्याची लायकीच नाही.स्वातंत्र्य संग्रामात काॅग्रेस विचारसरणीच्या हजारो देशप्रेमीनी बलिदान दिले,महात्मा गांधींनी ईंग्रजी राजवटीला ‘ चले ज्याव ‘ चा नारा देऊन देश स्वतंत्र केला.त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून कंगना या बुध्दीहिन महिलेने राष्ट्रद्रोह केला आहे,अशा शब्दात जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले यांनी तिचा निषेध केला.लवकरच तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त करणारे निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केले.आणि कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पद्मश्री किताब काढून घ्या,अशी मागणी केली.
यावेळी प्राचार्य मल्लेशी बिडवे,डाॅ.बसवराज बगले, भीमराव बाळगी,अशोक कोनापुरे शिवयोगी बिराजदार, सुधीर लांडे,राधाकृष्ण पाटील,रमजान नदाफ,नागेश बंगाळे आदी जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थिती होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *