सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाची भूमिका
दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मात्र साधेपणाने साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य विषयक उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची भूमिका सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाने जाहीर केली आहे.
सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक शिवानुभव मंगल कार्यालय येथे नुकतीच झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष माजी आमदार नरसिंग मेंगजी होते. यंदा इतर खर्च न करता तो निधी रक्तदान शिबीर, प्लाझमा दान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. मेंगजी यांनी सांगितले.
यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनीही भाषण केले. या बैठकीस मानाच्या गणपतीचे सुधीर देशमुख, ट्रस्टी सदस्य उत्सव पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
इच्छुकांना आवाहन…
ज्या सदस्यांना यंदाच्या वर्षीच्या उत्सवासाठी पदाधिकारी म्हणून कार्य करायचे आहे अशा सदस्यांनी १५ ऑगस्टपर्यंत अर्ज वसंत पैलवान रसपानगृह, सावरकर मैदान येथे आणून द्यावेत असे आवाहन कार्यवाहक संजय शिंदे यांनी केले आहे.
Leave a Reply