सोलापूर (प्रतिनिधी): येथील हरित वसुंधरा फाउंडेशनने वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधत ‘ एक व्यक्ती एक रोप’ हा उपक्रम राबवला होता
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी हरित वसुंधरा फाउंडेशन कडे ऑनलाईन व फोनद्वारे सोलापूर शहर व परिसरातील पाचशे वीस लोकांनी सहभाग नोंदविला होता.
स्वातंत्रदिनी शहरातील सात रस्ता येथे कोविड-१९ च्या शासन नियमावलीचे पालन करत हा उपक्रम पार पडला.
शनिवारी सकाळी १० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत फाउंडेशनच्या सदस्यांनी ५२० रोपांचे मोफत वितरण केलं.
हरित वसुंधरा फाउंडेशन या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट २०१६ रोजी झाली होती.
सुरवातीच्या काळात शहरातील काही अभियंत्यांनी एकत्र येत ह्या संस्थेची स्थापना केली होती मात्र अल्पवधीच ही संस्था संपूर्ण शहर व जिल्हात नावारुपाला आली.
गेल्या चार वर्षात हरित वसुंधरा फाउंडेशनने सोलापूर शहर व जिल्हात ४ हजार रोपांचे मोफत वृक्षारोपण केले आहे.
वृक्षसंवर्धनची गरज ओळखुन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी हरित वसुंधरा फाउंडेशन मोलाचा वाटा उचलत आहे.
वाढतं तापमान,प्रदुषण, पाऊसाचे कमी जास्त होत असलेले प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता वृक्ष लागवड अन् संवर्धन हाच एकमेव पर्याय आहे हे ओळखुन हरित वसुंधरा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असल्याचं मत संस्थेचे अध्यक्ष अमित बनसोडे यानी व्यक्त केलं. यावेळी सिद्धेश्वर टेंगळे,प्रशांत गाजुल,सागर संभारंभ,तानाजी यादव, दीपक गायधनकर, नरेश गाजुल, द्वारकेश सावंत,सागर मुरडे, सागर चिंचोळकर,रोहन खंदारे,अजय आलटे, रोहित कसबे,मयूर क्षीरसागर,संतोष वायदंडे,राजा गंदम उपस्थित होते.
Leave a Reply