जगातील दुसरा सर्वाधिक बाधित देश; एकाच दिवसात ९०,६०० कोरोना रुग्ण…

कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काही वाढतच आहे. रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असल्याने सर्व स्तरातून चिंता व्यक्त होत आहे. अशातच आता अजुनच चिंताजनक बातमी समोर आली आहे. एकाच दिवसात 90,600 रुग्ण सापडले आहेत. एका दिवसात एवढे रुग्ण सापडणारा भारत पहिला देश बनला आहे. याचबरोबर एकूण रुग्ण संख्या 41,31,690 झाली आहे.
भारतात करोना विषाणूने 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. तर आजवर ७० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारत जगात करोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिललाही मागे टाकलं आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत भारतापुढे आता केवळ अमेरिकाच आहे.अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा हा ६२ लाखांच्या पार पोहोचला आहे. तर १ लाख ८७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २२ लाख ८३ हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. तर या देशात अद्याप ३७ लाखांहून अधिक करोनाबाधित लोक आहेत. ब्राझिलमध्ये बाधितांचा आकडा हा ४१ लाखांच्या जवळपास आहे. तर १ लाख २५ हजारांहून अधिक लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ३४ लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत. तर ५ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. शनिवारी रात्री राज्यांकडून आलेल्या आकडेवारीनंतर भारताने ब्राझिलला मागे टाकल्याचे समोर आले.