माढा 1778 | आज नव्याने तालुक्यात 70 ‘पॉझिटिव्ह’ तर…

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.आज नव्याने माढा तालुक्यात 70 पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढत आहे.

कोरोना तपासणी जास्त होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.
आज माढा तालुक्यातील नागरी भागात 19 तर ग्रामीण भागात 51जणांचा अहवाल बाधित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी आज रविवार दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी दिली.
आज आढळून आलेले बाधित…
कुर्डूवाडी 17, माढा 2, टेंभुर्णी 1, भोसरे 2,तांदुळवाडी 20, बेंबळे 1, मोडनिंब 7, भुताष्टे 18,अरण 2, या गावात बाधित व्यक्ती आढळून आले आहेत.

Madha

आजपर्यंत माढा तालुक्यात 926 जण बरे झाले असून 852 जणांवर उपचार सुरू आहेत तर आज 4 जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कुर्डुवाडी 3, शेवरे 1 व्यक्ती मृत्यू पावली आहे. एकून मृत्यू झालेली संख्या 51 इतकी झाली आहे. त्यामुळे प्रशासनातील आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्या प्रमाणे माढा तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.