Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

ठाकरे सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून या निमित्ताने राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अशी माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण स्थगिती दिल्यामुळे पोलीस भरती होऊ नये . अध्यादेश  काढल्यानंतर ,न्यायालयाच्या निर्णयानंतर भरती प्रक्रिया राबविली यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार 

Police recruitment

पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *