Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

MH13 News Network

सोलापूर शहरात आज गुरूवारी दि.24 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 54 रुग्ण आढळले असून यामध्ये 30 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 30 इतकी आहे.

आज गुरूवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 523 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 469 निगेटीव्ह आहेत.
आज पुन्हा 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8117 असून एकूण मृतांची संख्या 465 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 991 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6661 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *