सोलापूरच्या शहर व औद्योगिक विकासात अडथळा ठरलेली श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्यासंदर्भात काही उद्योजकांनी आणि समाजसेवक यांनी महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना निवेदन दिले.त्यावेळी चिमणी पाडकामा बद्दल थांबलेल्या कार्यवाहीबद्दल या सर्वांनी माहिती घेतली.
सोलापूरच्या विकासात अडथळा ठरलेली सोलापूर सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणीच्या पाडकामा विषयी सोलापूरच्या तज्ञ शिष्टमंडळाने सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन कार्यवाही करण्या संबंधीच्या त्रुटी समजावून घेतल्या. सुप्रिम कोर्टचे स्पष्ट निर्देश असुनही सोलापूर महापालिकेच्या वतीने होणाऱ्या दिरंगाईबद्दल नाराजीचा सुर सर्व सोलापूरकरांच्या वतीने तज्ञ मंडळींनी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले.
सोलापूरच्या विकासात अडथळा असलेली अनाधिकृत चिमणीचे पाडकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि सोलापूरला नागरी उड्डायन मंत्रालय द्वारा मंजूर उड्डाण योजने अंतर्गत विमानसेवा त्वरित सुरू होण्यासाठी सोलापूरातील तज्ञ शिष्टमंडळाने आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, बांधकाम परवाना विभाग आणि उपायुक्त यांची भेट घेतली. सर्व सुविधायुक्त आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी होटगी रोड येथील सोलापूर विमानतळ, फक्त अनाधिकृत चिमणीच्या अडथळ्यामुळे कार्यान्वित होऊ न शकणे म्हणजे अप्रत्यक्षपणे सोलापूरच्या विकासात जाणुन बुजुन निर्माण केलेला अडथळा आहे असा सुर तज्ञ शिष्टमंडळाने अधिकार्यांसमोर व्यक्त केला.
तज्ञ शिष्टमंडळाने सर्व तांत्रिक माहिती अधिकार्यां दिली आणि सोलापूरच्या विकासाठी त्वरित ठोस उपाययोजना करण्या संबंधी सकारात्मक चर्चा केली. सोलापूरकरांच्या वतीने तज्ञ मंडळात गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.विजय कुंदन जाधव, उद्योजक श्री.केतन शहा, उद्योजक श्री.संजय थोबडे, वेकअप फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.मिलिंद भोसले, श्री.योगीन गुर्जर, श्री.संकेत जेसुदास, श्री. सलाउद्दीन शेख आदी उपस्थित होते
Leave a Reply