सोलापूर : शहरातील संभाजी (कंबर) तलाव जवळ असलेला विजापूर रस्ता जडवाहतुकीसाठी आणखी 6 दिवस बंदच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.
संभाजी तलावाजवळील रेल्वे पुलाजवळ ड्रेनेजलाइन दुरुस्तीचे काम महापालिकेच्यावतीने चालू आहे. सदर कामाकरिता पत्रकार भवन चौक ते झाशीची राणी पुतळा हा मार्ग पूर्णपणे 14 नोव्हेंबर पर्यंत हलकी व दुचाकी वाहने वगळून जडवाहतुकीतकरिता बंद करण्यात आला होता. सदरचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण झाले नसून काम करीत असताना सातत्याने वाळू ढासळत आहे. सदरचे काम जादा खोलवर असल्याने व काम करताना माती, दगड खाली येत असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे काम पूर्ण होण्याकरिता पत्रकार वहन ते झाशीची राणी या मार्गावरून जडवाहतूक बंद करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने या मार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. सोलापूर हुन वैजापूर कडे जाणाऱ्या जड वाहतुकीकरिता महाविर चौक, आसरा चौक, डीमार्ट, गोविंद श्री मंगल कार्यालय, दावत चौक, भारती विद्यापीठ, संत रोहिदास चौक, ते पुढे या मार्गाने जाताना व येताना अवलंब करण्यात यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक पाटील यांनी केली आहे.
Leave a Reply