सोलापूर जिल्ह्यातील वर्षभरात विविध बाबींवर उत्कृष्ट पध्दतीने कामगिरी बजावलेल्या मंद्रूप पोलीस ठाण्याचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दरवर्षी जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात येत असून यात विविध उपक्रम व पोलीस ठाण्यांच्या विविध नावीण्यपूर्ण गोष्टींची तपासणी करून विशेष पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. जिल्ह्यात मंद्रूप पोलीस ठाण्याला चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कार वितरणप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील विविध ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.