Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात गुरुवारी दि. 14 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 39 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 17 स्त्रियांचा समावेश आहे.

आज गुरुवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 669 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 630 निगेटीव्ह तर 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 26 आहे. आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…

मंगल रेसिडेन्सी आसरा चौक, मंठाळकर वस्ती तुळजापूर नाका, लक्ष्मी नगर इंदिरा नगर, कोनार्क नगर विजापूर रोड, सदिच्छा नगर विजापूर रोड, फलमारी झोपडपट्टी, अभिमान श्री नगर, देगाव, भवानी पेठ, विश्वकर्मा अपार्टमेंट होटगी रोड, महेश कॉलनी, शिवगंगा नगर, एन.जी.मिल चाळ, अक्षर सोसायटी जुळे सोलापूर, निर्मिती विहार विजापूर रोड, राघवेंद्र नगर मुरारजी पेठ, श्रीकांत नगर जुळे सोलापूर, कस्तुरबा मार्केटजवळ, रोहिणी नगर सैफुल, प्रमोद नगर विजापूर रोड, अशोक नगर विजापूर रोड, मोहितेनगर होटगी रोड, जगदंबा नगर जुळे सोलापुर, साखर पेठ, आशिर्वाद नगर लक्ष्मी पेठ, सिद्धेश्वर सोसायटी भवानी पेठ, आंबेडकर नगर नई जिंदगी, सुशीलनगर जुळे सोलापुर, दक्षिण सदरबझार या परिसरातील अकरा पुरुष आणि चौदा महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

या भागातील दोघांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील सनसिटी दमाणी नगर येथील 67 वर्षांचे एक पुरुष तर सेंटजोसेफ शाळेजवळ रेल्वे लाइन्स येथील 73 वर्षांचे पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,389 असून एकूण मृतांची संख्या 616 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 296 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10477 इतकी आहे.


हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *