माढा : तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठीच्या मतदानासाठीची शासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन सर्व कर्मचारी ज्या त्या गावात पोहोचले असल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.
माढा तालुक्यातील एकंदर 82 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होत असुन त्यामध्ये आठ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 74 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान होत आहे. या 74 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी 266 मतदान केंद्रे असणार असुन प्रत्येक मतदान केंद्रसाठी चार कर्मचारी, एक शिपाई, आणि एक पोलिस कर्मचारी असणार आहे. यासाठी मतदान साहित्यासह 1596 कर्मचारी ज्या त्या बुथवर रवाना झाले आहेत. याशिवाय 15 झोनल ऑफिसर नियुक्त केले आहेत.
Leave a Reply