विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेस रविवारपासून प्रारंभ 60 हजार विद्यार्थी देणार परीक्षा; हेल्पलाईन नंबर जाहीर

MH13 NEWS Network

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी द्वितीय आणि तृतीय, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष आणि फार्मसी व इंजिनिअरिंगच्या तृतीय, चतुर्थ वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांना रविवार, 24 जानेवारी 2021 पासून ऑनलाइन पद्धतीने प्रारंभ होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली. सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा देणार असून यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने या परीक्षा मार्च-एप्रिल 2021 मध्ये होणार आहेत. पदवी प्रथम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षाही मार्च-एप्रिलमध्ये होतील.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाकडे कन्सेंट फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. त्यावर सर्व आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत. https://ictrd.org/PAHSUFORM/ या लिंकवरून कन्सेंट फॉर्म भरता येणार आहे. कन्सेंट फॉर्म व्यवस्थितपणे वाचून मोबाईल नंबर व ई-मेल आयडी बिनचूक भरून देणे आवश्यक आहे. 22 जानेवारीपर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे. एकदाच हा फॉर्म भरता येणार आहे.

*हेल्पलाईन नंबर*
ऑनलाइन परीक्षा देताना काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ परीक्षा विभागाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. 8421068436, 8421238466, 8421228432, 8421905623, 8421908436, 8421354532, 8010083760, 8010085759, 8010076657, 8010093831 परीक्षा देताना काही समस्या उद्भवल्यास या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

*या पोर्टलवरून देता येणार परीक्षा*
pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले पीआरएन नंबर यूजर आयडीसाठी वापरून मोबाईल नंबर तसेच ईमेलवर आलेल्या पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. सर्व महाविद्यालयांकडेही विद्यार्थ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पासवर्ड मिळाले नाही, अशांनी महाविद्यालयाकडे संपर्क साधावा. पासवर्ड न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी फरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड घ्यावे. परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी असून तीन तास स्लॉट ओपन राहणार आहे. काही समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.