हिंदु देवदेवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणा !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

अ‍ॅमेझॉन प्राईम’वर चित्रपट अभिनेते सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद जीशान अय्यूब और गौहर खान यांची भूमिका असलेली, तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसिरीज नुकतीच प्रसारित झाली आहे. या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे व्यक्तीरेखा दाखवून त्यांचाही अपमान केलेला आहे. तसेच ‘जेएनयू’मधील देशद्रोही घोषणा देणार्‍या कन्हैयाकुमार आणि तत्सम देशविरोधी घटकांचे उदात्तीकरणही करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तरी हिंदु देवदेवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि जातीयद्वेष पसरवणार्‍या ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २१ जानेवारी या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. हे निवेदन महसूल तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी स्वीकारले.

 

या वेळी सर्वश्री कृष्णहरी क्यातम, तुळसीदास चिंताकिंदी, बालराज दोंतुल, रमेश आवार, आनंद (भाऊ) मुसळे, विलास आडकी, हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

१. अशा प्रकारची कथानके रचून देशात अराजकता आणण्याचे काही षड्यंत्र तर नाही ना, याची चौकशी व्हावी. त्यासाठी या वेबसीरीजना पैसा पुरवणारे, तसेच त्यांचे निर्माते यांचीही चौकशी करावी.

२. ज्याप्रकारे चित्रपटांना सेन्सॉर करण्यासाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ आहे, त्या धर्तीवर कोणतेही नियंत्रण नसलेल्या अनिर्बंध वेबसीरीजवर अंकुश लावण्यासाठी, वेबसीरीजना ‘सेन्सॉर’ करणारी यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी.

३. ‘अ‍ॅमेझॉन’द्वारे यापूर्वी भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, भारतीय नकाशाचे विकृतीकरण करणे, हिंदु देवदेवतांचा अवमान करणारी उत्पादने विकणे, हिंदु महिलांविषयीच्या आक्षेपार्ह पुस्तकांची विक्री करणे आदी अनेक गैरप्रकार केले आहेत. त्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड संताप आहे. आता ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ने राष्ट्र आणि धर्म विरोधी वेबसिरीज प्रसारित करून पुन्हा गुन्हेगारी कृत्य केले आहे. त्यामुळे शासनाने ‘अ‍ॅमेझॉन’वरही कठोर कायदेशीर कारवाई करावी !