कोरोना अपडेट | सोलापुरातील 854 ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस ; या ठिकाणी मिळेल लस

सोलापूर, प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्प्यात खाजगी व सरकारी रुग्णालय मध्ये 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्याही लस टोचली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  60 वर्षावरील 864 ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली  तर गंभीर आजार असलेल्या 604 जणांनी लस घेतली असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी  आज शनिवारी दिली.

शहर जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी दवाखान्यात कोरोनाची लस  देण्यात येत आहे. आज गुरूवारी ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेल्या  1048 नागरिकांना आज लस देण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यातील 572 जणांनी लस घेतली असल्याचे डॉ. पिंपळे यांनी सांगितले तसेच आरोग्य कर्मचारी 435,  महसूल ,पोलीस अंगणवाडी  अशा 109 फ्रन्टलाइन वर्कर्सना लस देण्यात आली.

 

लसीकरणास चांगला प्रतिसाद

खाजगी, शासकीय रुग्णालयात नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज  सरकारी,  खाजगी रुग्णालयात लस देण्यात आले असून रुग्णालयाची संख्या वाढवण्यात आली आहे.

या ठिकाणी मिळेल लस

सोलापूर शहरातील सीएनएस हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, सिद्धेश्वर हॉस्पिटल, सोलापूर कॅन्सर  , मार्कंडेय रुग्णालय, गंगामाई हॉस्पिटल, चिडगुपकर ,रघुजी किडनी केअर हॉस्पिटल ,मोनार्क हॉस्पिटल ,यशोधरा हॉस्पिटल, लोकमंगल जैविक हॉस्पिटल मध्ये 250 रुपयांना ही लस उपलब्ध आहे. महापालिकेच्या दाराशा, साबळे, रेल्वे या शासकीय हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत दिली जात आहे. त्याचबरोबर तालुक्यातील विविध दवाखान्यात लस मिळेल.