सोलापूर केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयात शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी फोर्ब्स मार्शल पुणे चे विभागीय व्यवस्थापक श्री प्रसाद पुली यांचे ” प्रवेश स्तरावर औद्यागिक रोजगार अपेक्षाची तयारी” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वक्ते़ श्री प्रसाद पुली यांचे केगाव सिंहगड महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे यांनी स्वागत केले
या व्याख्यानात श्री प्रसाद पुली यांनी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना फोर्ब्स मार्शल कंपनी ची आोळख करून दिली.ही कंपनी सन १९२६ पासून टेक्सटाईल उत्पादन क्षेत्रात लागणारी सर्व अद्यावत अवजारे निर्माण करणारी असून कंपनीची सुरूवात अहमदाबाद गुजरात येथे झाली. १९५८ पासून कासारवाडी पुणे येथे प्रत्यक्षात उत्पादन सुरू केले. ही कंपनी टेक्सटाईल क्षेत्रात कशी कार्यरत आहे, कशाप्रकारे काम करते याची तपशीलवार माहिती दिली.
मुख्यतः अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याकडून कंपन्यांच्या अपेक्षा काय असतात यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी ज्ञानाचा कंपनी मध्ये कसा वापर करावा हे त्यांनी सांगितले. करिअरच्या प्रगतीसाठी काय करावे, काय वाचावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञानाचे महत्त्व सांगितले स्वतःचे व्यवस्थापन, शिस्त, आचरण याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या ऑनलाईन व्याख्यानात विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे श्री प्रसाद पुली यांनी समाधान केले.
या ऑनलाईन व्याख्याना साठी यांत्रिकी विभागातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अविनाश लावणीस यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. सागर नवले यांनी सहभागी मान्यवरांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply