‘या’ प्लास्टिक कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल…

 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एका प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे.सकाळी सात वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही आग लागल्याचं समजत असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या रवाना झाल्या आहेत.

अग्निशमन दलाकडूनवेगाने पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसा, शहापूर तालुक्यातील वेहळोली- आसनगाव फाट्याजवळ असलेल्या कृष्णा प्रमोशन कंपनीमध्ये ही आग लागली आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणी मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त अद्याप मिळालेलं नाही. पण आकाशात धुराचे लोळ दिसत असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय आग लागण्याचं नेमकं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही.