आज सोलापूर शहरात बरे झाले 300; तर 5 जणांचा मृत्यू

Big9news Network

सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 5 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.18 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 257 रुग्ण आढळले असून यामध्ये 166 पुरुष तर 91 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2702 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2545 निगेटीव्ह तर 257 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 300 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.